खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून प्रतापगडावर श्री तुळजाभवानीचरणी राज्यभरात चांगला पाऊस पडण्यासाठी साकडे
पांचगणी न्यूज नेटवर्क प्रतापगड : सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाचे सावट दूर होऊन दमदार व समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्यांना दुष्काळाच्या संकटातून मोठा दिलासा मिळावा, या अत्यंत लोकहिताच्या आणि महत्त्वाच्या उद्देशाने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी किल्ले प्रतापगडावरील ऐतिहासिक श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी साकडे घातले आहे. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पार्श्वभूमीवर आणि महाअष्टमीच्या मंगलमुर्हुतावर…