सातारा जिल्हा बँकेच्या महाबळेश्वर मतदारसंघात चुरस शिगेला; राजपुरे विरूद्ध मोरे थेट दुरंगी लढत निश्चित!
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघाचे सर्व चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. कायदेशीर काय आणि राजकीय घडामोडींचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूंपैकी कोणीही माघार घेतलेली नाही. परिणामी, महाबळेश्वरच्या सहकार क्षेत्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता रुपाली राजेंद्र राजपुरे…