Home » सातारा » एनडीआरएफच्या मदतीने सातारा हद्दीतील नदी पात्रात वारकऱ्याला विठ्ठल भेटला…

एनडीआरएफच्या मदतीने सातारा हद्दीतील नदी पात्रात वारकऱ्याला विठ्ठल भेटला…

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

शिरवळ : पुणे जिल्ह्यातून सातारा हद्दीत येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या वारीच्या दर्शनासाठी आलेले वारकरी गणेश शंकर विषे वय ४२ यांचा गर्दीमुळे नीरा नदीच्या पुलावरून तोल गेला. त्यामुळे ते खाली पडले. त्यावेळी तातडीने एनडीआरएफच जवानांनी त्यांना तातडीने मदत केली. तातडीने जणू काही विठ्ठलच त्यांच्या मदतीला धावून आला असा भास झाला .

 

आषाढी वारी निमित्त अनेक वारकरी व सेवा करी आषाढी वारी सोबत पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. सातारा जिल्हा हद्दीतील नीरा नदीच्या पुलावरून खूप मोठी गर्दी जमली होती. सकाळच्या वेळी श्री विषे वारकऱ्यांचा चुकून नीरा नदीच्या पुलावरून पाय घसरला . ते खाली पडताच एनडीआरएफच्या जवानांनी त्या ठिकाणी धाव घेतली व प्राथमिक उपचार करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

नीरा नदीवरील पुलानजीक पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी शासकीय यंत्रणा पोलीस व एनडीआरएफ जवान लक्ष ठेवून आहेत.आषाढी वारी दरम्यान सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या ५ व्या बटालियनची विविध पथके पालखी मार्गावरील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. आळंदी-देहू येथून संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी व्यवस्थापनासाठी जादा पथके तैनात आहेत . वारीच्या कालावधीत पडणारा पाऊस आणि पूरस्थिती लक्षात घेता, या मुख्य मार्गांव्यतिरिक्त सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या शेजारील जिल्ह्यांमध्येही एनडीआरएफची आपत्कालीन रेस्क्यू पथके हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहेत.

पालखी सोहळा १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात (लोणंद) दाखल झाली आहे. सातारा पोलिसांचे २,७०० हून अधिक जवान लोणंद आणि पुढील मार्गावर सज्ज आहेत . सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलीस बल , शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि होमगार्ड्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या वारीच्या सुरक्षेसठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers