पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पाचगणी पोलीस ठाण्याच्या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे परिसरातील २५ नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन पुन्हा मिळाले आहेत, तर सायबर फ्रॉडमध्ये आर्थिक फसवणूक झालेल्या अर्जदारांना तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात असून, पोलीस प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.
चालू वर्ष २०२६ मध्ये पाचगणी परिसरातून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही नागरिक ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे (सायबर फ्रॉड) शिकार झाले होते.
नागरिकांच्या या गंभीर समस्यांची दखल कामगिरीत पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पाचगणी पोलीस पथकाने दाखवलेली ही तत्परता आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सर्व अधिकारी व अमलबजावणी कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. आपल्या हक्काचे मोबाईल अन् कष्टाचे पैसे परत मिळाल्याने स्थानिक नागरिक व पर्यटकांनी पाचगणी पोलिसांच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे.



