कराड

नीट पेपरफुटी, लाठीचार्ज विरोधात कराडात युवक युवतींचे एक दिवसीय आंदोलन

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता कराडमध्येही उमटले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत शुक्रवारी कराडातील महाविद्यालयीन युवक, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.   यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवक

कराडात वकिलांकडून एकदिवस काम बंद ठेऊन ‘जंतर-मंतर’वरील लाठीमारीचा निषेध!

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : नीट परीक्षा गैरव्यवहार, शिक्षणातील अनियमितता आणि इतर मागण्यांसह केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे मोर्चातील हजारो विद्यार्थी-तरुणांवर पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनी लाठीमार केला. या घटनेच्या निषेधाचे कराडात देखील पडसाद उमटले. बुधवारी कराड बार असोसिएशनच्या वतीने संपूर्ण एक दिवस काम बंद ठेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनच्या

मोटार सुरु करताना शॉक लागून किरपेतील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू : वांग नदीकाठावरील बेली शिवारात घटना 

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : शेतात पाणी पाजण्यासाठी विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना किरपे, ता. कराड येथे मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.   बाळासाहेब पंढरीनाथ देवकर (वय ५२, रा. किरपे, ता. कराड) असे शॉक लागून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, किरपे,

लघु पाटबंधारे योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या; आमदार अतुलबाबा भोसले यांची जिल्हा नियोजन बैठकीत आग्रही मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड  : कराड दक्षिण मतदारसंघातील लघु पाटबंधारे योजनांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. या मागणीची तत्काळ दखल घेत, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री

उंडाळे नजीक अपघातात एक ठार, एक जखमी

पांचगणी न्यूज नेटवर्क उंडाळे : कराडहुन देवरुखकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक ठार तर एकजण जखमी झाला. कराड- चांदोली रोडवर लोहारवाडी (येणपे) ता. कराड गावच्या हद्दीत रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पांडुरंग विठ्ठल हिनुकले (वय ५०, गणेशवाडी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर शंकर दादू हिनुकले हे

नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणारा अटकेत

  पांचगणी न्यूज नेटवर्क कराड  ः वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने एका नव्हे तर अनेक व्यक्तींना गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला आहे. जिवन

पिस्टल विक्रीकरीता आलेल्या चौघांना अटक : कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ः चार देशी बनावटीचे पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड, दि. 11 ः देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी

शेणोलीत ‌‘एमडी ड्रग्ज‌’चा सौदा उधळला! : कराड तालुका पोलिसांची कारवाई ः 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड  ः शेणोली बसस्टँण्ड परिसरात एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) विक्रीकरीता आलेल्या दोघांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1.890 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन), दोन मोबाईल व एक दुचाकी असा सुमारे 80 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये पोलिसांनी एकास अटक केली असून एक विधीसंघर्ष बालक आहे. अजय यशवंत कापूरकर रा. जुळेवाडी,

कराड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार; भाजी मंडई आणि कृष्णा घाटावर ९ जणांना घेतला लचका, नागरिकांमध्ये प्रचंड घबराट

पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : कराड शहरात सोमवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. शहरातील सर्वाधिक गर्दीची ठिकाणे असलेल्या मुख्य भाजी मंडई, कृष्णा पूल आणि कृष्णा घाट परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः उच्छाद मांडत तब्बल नऊ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कराड शहरात एकच खळबळ

​’खाशाबा’ चित्रपटाचा टीझर वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयीन आयोगाच्या नियुक्तीवर शनिवारी सुनावणी

लेखक संजय दुधाणे यांच्या पुस्तकातील दृश्ये वापरल्याचा दावा; पुणे दिवाणी न्यायालयात कायदेशीर लढाई तीव्र ​कराड (पांचगणी न्यूज नेटवर्क) : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर ऑनलाइन प्रदर्शित होताच तो मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या टीझरमधील पाच प्रमुख दृश्ये लेखक संजय दुधाणे यांच्या ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या मूळ पुस्तकातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या