
पाचगणीत मुसळधार; स्लम एरियासह विविध भागांत नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ पाहणी, युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या अतिवृष्टीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक मुख्य रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले आहेत, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पाचगणी पालिकेचे












