
किसन वीर महाविद्यालयाच्या माजी मराठी विभागप्रमुख डॉ. नीलम हातेकर यांचे निधन; पाचगणीत हळहळ, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : येथील ‘सृजनशक्ती महिला मंडळा’च्या संस्थापिका-अध्यक्षा, वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या माजी मराठी विभागप्रमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. नीलम रत्नाकर हातेकर (वय ८४) यांचे आज वाई येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाचगणी व वाई परिसरातील शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, एका ध्येयवादी शिक्षिका












