पांचगणी

राज्यस्तरीय रिंक फुटबॉल स्पर्धेत पाचगणीच्या विद्या निकेतन हायस्कूलचा डंका; पटकावला तृतीय क्रमांक!

पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : क्रीडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीतील नामांकित ‘विद्या निकेतन हायस्कूल’ने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या यशाचा सुवर्णध्वज फडकावला आहे. येथील संजीवन विद्यालय येथे २७ व २८ जून २०२६ रोजी पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘इंटर-स्कूल स्टेट रिंक फुटबॉल चॅम्पियनशिप’  या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्या निकेतनच्या १२ वर्षांखालील मुलांच्या ६-अ-साइड  संघाने दमदार कामगिरी

राजपुरी शाळेचा शतकपूर्ती संकल्प: २१०० सीडबॉलच्या माध्यमातून ‘हरित क्रांती’चा संदेश!

पांचगणी न्यूज नेटवर्क/ प्रमोद रांजणे पाचगणी: शंभर वर्षांची गौरवशाली आणि दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, राजपुरीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सध्या विविध उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. याच सुवर्णमयी वर्षानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता, भावी पिढीला निसर्गाची अनमोल भेट देण्यासाठी शाळेने पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शनिवार, दिनांक

पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ मोहीम संपन्न : पर्यटन स्थळवरील पर्यटक मुलांसाठी चार केंद्रावर डोस

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : ‘पोलिओमुक्त भारत’ हे राष्ट्रीय उद्दिष्ट अधिक बळकट करण्यासाठी आणि पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम आज अत्यंत उत्साहात राबविण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या सक्रिय सहभागामुळे या मोहिमेला दुर्गम भागापासून ते मुख्य शहरापर्यंत उदंड प्रतिसाद

संजीवन विद्यालयाच्या ‘अॅस्ट्रो टर्फ’वर राज्यस्तरीय रिंक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी येथील नामांकित संजीवन विद्यालयाच्या अत्याधुनिक कृत्रिम ‘अॅस्ट्रो टर्फ’ मैदानावर राज्यस्तरीय आंतरशालेय ‘इंटर-स्कूल स्टेट रिंक फुटबॉल चॅम्पियनशिप-२०२६’ स्पर्धेचे उद्घाटन झाले. संजीवन विद्यालयाच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत अंडर-१२ आणि अंडर-१५ वयोगटातील मुलांच्या कौशल्याची कसोटी लागणार असून, या निमित्ताने संपूर्ण पाचगणी नगरीत फुटबॉलचा फिव्हर पाहायला मिळत

पाचगणीतील पालिकेच्या ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना पँथर सेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : “आपण ज्या समाजात राहतो, वाढतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या निस्पृह आणि पवित्र भावनेतून सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे हे दरवर्षी नगरपालिका शाळेतील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. त्यांचे हे निरंतर सुरू असलेले कार्य केवळ कौतुकास्पद नसून, समाजातील इतर घटकांसाठीही अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे,” असे गौरवद्गार पाचगणी

एकाच नंबरवर दोन राज्यात दोन वाहने प्रकरणी बेळगाव आरटीओवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करा : अनिल बोधे यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : डिजिटलायझेशनच्या युगात सरकारी विभागांच्या कारभारातील घोळ अनेकदा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरतात, याचाच एक धक्कादायक प्रत्यय महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथे आला आहे. पाचगणी येथील रहिवासी व व्यावसायिक अनिल गजानन बोधे यांच्या मालकीच्या ‘बुलेट’ मोटरसायकलचा नंबर चक्क शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव आरटीओने एका ‘जीप’ गाडीला दिल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. गेल्या पाच

जिद्दीच्या जोरावर जावळीची लेक मुंबई हायकोर्टात! कु. आस्था कांबळेचा पाचगणी नगरपालिकेतर्फे गौरव

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरीही मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाचे शिखर सहज गाठता येते, हे जावळी तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. जावळी तालुक्यातील गणेश पेठ येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या कु. आस्था दीपक कांबळे हिने सर्व अडचणींवर मात करत एलएल.बी. (कायदा) पदवी

राजपुरी जिनियस’ उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दिशा : राजेंद्रशेठ राजपुरे ; जिल्हा परिषद आदर्श शाळेत प्रवेशोत्सव व गुणवंत गौरव सोहळा उत्साहात!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या युगात टिकून राहता यावे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा, राजपुरी येथे राबविला जाणारा ‘राजपुरी जिनियस’ हा उपक्रम कौतुकास्पद असून, यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळत आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी

सिद्धार्थनगर अंगणवाडीत लहानग्यांना शालेय साहित्याचे वाटप; नगरसेविका स्वाती कांबळे यांचा स्तुत्य उपक्रम

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : आपल्या सभोवतालच्या समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या गरीब घटकांना मदतीचा हात मिळावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपला उपयोग व्हावा, या उदात्त भावनेतून पांचगणी नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका स्वाती कांबळे यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महाबळेश्वर-पांचगणी परिसरातील शैक्षणिक व सामाजिक चळवळीला गती देत, त्यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत

पाचगणीकरांच्या रक्तदान-आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हून अधिक जणांचे रक्तदान

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळत असल्याने समाजातील प्रत्येकाने रक्तदानाच्या कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश पाचगणीत आयोजित रक्तदान शिबिरातून देण्यात आला. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचगणीतील बेबी पॉईंट परिसरातील ‘द पाचगणी क्लब’च्या सभागृहात युवा कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आणि बालाजी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान