Home » सातारा » नारीशक्तीच्या कर्तव्यदक्षतेने साताऱ्यात बालविवाहाच्या अक्षदा थांबल्या….

नारीशक्तीच्या कर्तव्यदक्षतेने साताऱ्यात बालविवाहाच्या अक्षदा थांबल्या…. 

पांचगणी न्यूज नेटवर्क / अजित जगताप

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लग्नाचे वय निघून गेले तरी लग्न होत नाही तर दुसऱ्या बाजूला बालविवाहाचे प्रमाण रोखण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. साताऱ्यातील नारीशक्ती फाउंडेशनच्या वतीने नुकताच एक बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे बालविवाहाच्या अक्षदा थांबल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या क्षेत्र माहुली या ठिकाणी आषाढीच्या शुभ दिवशीच दुपारी एक वाजता बाल विवाह करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. वऱ्हाडी मंडळी सह पुरोहित सुद्धा हजर होते.

या बाबतची माहिती मिळताच महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या कणखर रणरागिनी व नारीशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुनिशाताई शहा यांच्या सतर्कतेमुळे यशस्वीरित्या क्षेत्र माहुली या ठिकाणी आगमन केले. एका अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अन्यायापासून वाचविण्याचे धाडसाने प्रयत्न केला.

सामाजिक जाणीव असलेल्या साताऱ्यातील एका कार्यकर्त्यांनी एक दिवस आधी या बालविवाहाची माहिती नारीशक्ती फाउंडेशन अध्यक्षा सुनिशा ताई शहा यांना दिली होती. त्यांनी तातडीने सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याशी संपर्क साधून योग्य ती माहिती पुरविली.सातारा शहर पोलिस निरीक्षक एस.जी.म्हेत्रे यांच्या पोलिस पथकाने बालविवाहस्थळी जाऊन योग्य ती कारवाई अन्य सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातील होणारा बालविवाह एक दिवस आधी रोखण्यात प्रशासनास यश मिळाल्याचे समाधान लाभले आहे.

दरम्यान,नारीशक्ती फाऊंडेशन च्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कुणालाही बालविवाहाची माहिती मिळाल्यास नारीशक्ती फाऊंडेशनशी संपर्क साधावा.

समाजात वावरताना एक जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून वागले पाहिजे. आपल्या देशाची राज्यघटना आणि कायद्यांचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जर आपल्या परिसरात १८ वर्षांखालील मुलीचा किंवा २१ वर्षांखालील मुलाचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली, तर ती संबंधित प्रशासन किंवा अधिकाऱ्यांना तात्काळ कळवून असा बालविवाह थांबवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. अशा प्रकारे कायद्याचे पालन करून आणि योग्य माहिती योग्य ठिकाणी पोहोचवून आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो. एक सजग, जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतो. अशी प्रतिक्रिया नारीशक्ती फाऊंडेशन, सातारा अध्यक्ष श्रीमती शहा यांनी दिली आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी

*29, रामकृष्ण कॉलनी पोवई नाका,सातारा*

9850522534 बालविवाह रोखण्यासाठी संपूर्ण सत्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers