Home » सातारा » साताऱ्यात महावितरण कंपनीच्या चुकीच्या कामकाजा विरोधात आर.पी.आय.(अ. गट) मैदानात.

साताऱ्यात महावितरण कंपनीच्या चुकीच्या कामकाजा विरोधात आर.पी.आय.(अ. गट) मैदानात.

पांचगणी न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा महावितरण विभागात विविध प्रक्रिया व निधी मंजूर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा लागतो. हा निधी हाती आल्यानंतर काही भ्रष्ट अधिकारी चुकीच्या पद्धतीने वीज जोडणी व निविदा प्रक्रिया राबवतात. या विरोधात आता आरपीआय (अ गट )मैदानात उतरली आहे. याबाबत महावितरण कंपनीकडून सुधारणा न केल्यास पुढील पंधरा दिवसात महावितरण कंपनीला विजेचा झटका देण्यात येईल व सातारा अंधारात घालू अशी शाब्दिक लढाई आर.पी.आय. कार्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे.

आज सातारा येथे शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आर .पी. आय.राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ , सातारा जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, मदन खंकाळ, रामभाऊ मदाळे, राजू ओव्हाळ, सुनिल ओव्हाळ,महिला अध्यक्ष दामिनी निंबाळकर, महेश खंडझोडे,, वंदना सगरे ,वनिता खवळे, शीतल बल्लाळ , शाहरुख शेख, अक्षय जाधव, निलेश आप्पा पवार ,राजेंद्र होटकर, योगेश माने, सूरज गाडे, प्रदीप नलवडे, कृष्णा जाधव यांच्यासह महावितरण कंपनीचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातारा महावितरण कंपनीत तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा काही अधिकारी कर्मचारी त्याच जागी आर्थिक व्यवहार करून काम करत आहेत. शासकीय नियम पायदळी तुडवली जात आहेत. दलित वस्ती सुधार योजनेची कामे दलित वस्तीत न करता इतर ठिकाणी करून धनदांडग्यांचे भले करत आहेत. ठेकेदार म्हणजे महावितरण कंपनीसाठी एटीएम आहे. सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत एकमुखाने करण्यात आली. सदरची मागणी पूर्ण न झाल्यास आरपीआय राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र लढा उभारण्यात येणार आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनेक ठिकाणी महावितरण कंपनीची वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमध्ये अडथळा आलेले आहेत. हे अडथळे दूर न केल्यास भविष्यात आणखीन जीवित हानी होऊ शकते. याला सर्वस्वी महावितरण कंपनीत जबाबदार राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers