संजीवन विद्यालयाच्या ‘अॅस्ट्रो टर्फ’वर राज्यस्तरीय रिंक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी येथील नामांकित संजीवन विद्यालयाच्या अत्याधुनिक कृत्रिम ‘अॅस्ट्रो टर्फ’ मैदानावर राज्यस्तरीय आंतरशालेय ‘इंटर-स्कूल स्टेट रिंक फुटबॉल चॅम्पियनशिप-२०२६’ स्पर्धेचे उद्घाटन झाले. संजीवन विद्यालयाच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत अंडर-१२ आणि अंडर-१५ वयोगटातील मुलांच्या कौशल्याची कसोटी लागणार असून, या निमित्ताने संपूर्ण पाचगणी नगरीत फुटबॉलचा फिव्हर पाहायला मिळत…