आषाढी वारी दरम्यान घरफोड्यांपासून सावधान! पांचगणी पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचे वातावरण आहे. पांचगणी व परिसरातील शेकडो भाविक दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी वारी, दिंडी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मात्र, विठ्ठल दर्शनाच्या या आनंदाच्या काळात पाठीमागे बंद असणाऱ्या घरांचा गैरफायदा चोरटे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर, महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र…