नीट पेपरफुटी, लाठीचार्ज विरोधात कराडात युवक युवतींचे एक दिवसीय आंदोलन
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता कराडमध्येही उमटले. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत शुक्रवारी कराडातील महाविद्यालयीन युवक, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवक…