कोयना धरण पायथा वीजगृहातून नदीपात्रात पाणी सोडले; १०५० क्युसेक्सने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!
पांचगणी न्यूज नेटवर्क पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची सातत्याने होणारी आवक लक्षात घेऊन धरण प्रशासनाने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळी पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १०५० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. नदीपात्रात पाणी…