जर्मन-फ्रेंच भाषेत पाचगणीचा झेंडा; विद्या निकेतनच्या ११ विद्यार्थ्यांचा पुण्यात राज्यस्तरीय गौरव
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही आंतरराष्ट्रीय भाषांचे ज्ञान आत्मसात करण्याची प्रचंड क्षमता असते, हे पाचगणीतील विद्या निकेतन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जर्मन व फ्रेंच भाषा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत शाळेच्या तब्बल ११ विद्यार्थ्यांनी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात आपल्या यशाचा डंका वाजवला. शाळेचे मुख्याध्यापक…