Home » पांचगणी » जर्मन-फ्रेंच भाषेत पाचगणीचा झेंडा; विद्या निकेतनच्या ११ विद्यार्थ्यांचा पुण्यात राज्यस्तरीय गौरव

जर्मन-फ्रेंच भाषेत पाचगणीचा झेंडा; विद्या निकेतनच्या ११ विद्यार्थ्यांचा पुण्यात राज्यस्तरीय गौरव

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही आंतरराष्ट्रीय भाषांचे ज्ञान आत्मसात करण्याची प्रचंड क्षमता असते, हे पाचगणीतील विद्या निकेतन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जर्मन व फ्रेंच भाषा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत शाळेच्या तब्बल ११ विद्यार्थ्यांनी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय गौरव सोहळ्यात आपल्या यशाचा डंका वाजवला.

​शाळेचे मुख्याध्यापक अथर्व बिरामणे व सचिव स्वाती बिरामणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात पार पडलेल्या जर्मन व फ्रेंच भाषा परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या परीक्षेमध्ये ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर प्रथम, तर २ विद्यार्थ्यांनी थेट राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून पाचगणीच्या शैक्षणिक वैभवात भर घातली.

​पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये शुद्धी भिशनानी, देव राणा, दिव्याप्राची व्हाणावटे, अन्वी महाजन, अश्वभा गुरव, दुर्गा त्रिमुखे, यश खुडे, परी बट्टम, भाविका साळुंखे, झोया अन्सारी आणि किमिया बोदरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

​पुण्यातील कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि आत्मविश्वासाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या या प्रवासात श्री. थोरवे व सौ. सुनीता मॅडम यांनी चोख नियोजन केले. विद्यार्थ्यांची उत्कृष्ट शिस्त आणि जबाबदारीचे भान संपूर्ण सोहळ्यात वाखाणण्याजोगे ठरले.

​विद्या निकेतनच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण व करिअरच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून,मुख्याध्यापक अथर्व बिरामणे व सचिव स्वाती बिरामणे तसेच सर्व स्तरातून या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे कौतुक होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers