कामाच्या दिरंगाई अन् निकृष्ट दर्जाविरोधात कुडाळवासीय आक्रमक; १५ ऑगस्टपासून सामूहिक उपोषणाचा इशारा!
पांचगणी न्यूज नेटवर्क कुडाळ : “आमचा विरोध विकासाला किंवा कामाला मुळीच नाही, तर काम करण्याच्या मनमानी पद्धतीला आणि होणाऱ्या दिरंगाईला आहे…” असा संतप्त सूर लावत कुडाळ येथील ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राथमिक जिल्हा मार्गाच्या रखडलेल्या व दर्जाहीन कामाविरोधात आवाज उठवत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला १५ ऑगस्टपासून सामूहिक उपोषणाचा इशारा दिला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे…