पांचगणी पोलीस ठाण्यात विविध विभागांची संयुक्त बैठक: बेवारस वाहने, कर संकलन आणि वाहतूक नियोजनावर महत्त्वपूर्ण निर्णय
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाचगणी-महाबळेश्वर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. आज सकाळी पांचगणी पोलीस ठाणेच्या सभागृहात ‘विशेष प्रकल्प अंतर्गत पर्यटन स्थळ विकास व पर्यटक सुरक्षितता’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार…