आखाड्यात गाजली पांचगणीच्या विद्या निकेतनची ताकद; सहा मल्लांची सुवर्ण झेप, थेट जिल्हास्तरावर एन्ट्री!
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : मैदानावरची ताकद, अचूक डावपेच आणि विजयाच्या जबर जिद्दीच्या जोरावर पाचगणी येथील विद्या निकेतन हायस्कूलच्या मल्लांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत कौशल्याची छाप पाडत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. बाथा हायस्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शाळेच्या तब्बल सहा पैलवानांनी आपापल्या वजनगटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयशाला गवसणी घातली. या सुवर्णमयी कामगिरीच्या बळावर…