श्रीराम विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न: जावळी तालुक्याचा दुष्काळात समावेश करण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर
पांचगणी न्यूज नेटवर्क करहर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी मानल्या जाणाऱ्या येथील श्रीराम विकास सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा स्थानिक श्रीराम मंदिरात अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेची पारदर्शकता आणि सभासदांचे हित जपण्यासाठी संस्था सदैव तत्पर असून, आगामी काळात सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्जवाटप वाढवण्यासोबतच विविध विकासकामे राबवण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात…