
आंबेनळी घाट पुढील ४ दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पांचगणी न्यूज नेटवर्क कुंभारोशी : महाबळेश्वर आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांमधील अत्यंत संवेदनशील अशा पोलादपूर-महाबळेश्वर ‘आंबेनळी घाटा’तील सर्व प्रकारची वाहतूक आजपासून (३ जुलै) ६ जुलै २०२६ पर्यंत पुढील चार दिवस पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात होणारी संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी रायगडचे जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी आज हा अत्यंत महत्त्वाचा आपत्कालीन घाटबंदीचा आदेश




