कोयनानगरमध्ये मानवी वस्तीत जखमी बिबट्या जेरबंद; प्रशासनाच्या संथ प्रतिसादाबद्दल नागरिकांमधून प्रश्नचिन्ह
पांचगणी न्यूज नेटवर्क पाटण : कोयनानगरमध्ये मानवी वस्तीत पुन्हा एकदा बिबट्या शिरल्याने येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या एका घराशेजारील ओढ्याजवळ दीड ते दोन वर्षे वयाचा एक जखमी बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, या बिबट्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याची माहिती समोर आल्याने परिस्थिती अधिकच संवेदनशील आणि धोकादायक बनली…