Home » कराड » पिस्टल विक्रीकरीता आलेल्या चौघांना अटक : कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ः चार देशी बनावटीचे पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त

पिस्टल विक्रीकरीता आलेल्या चौघांना अटक : कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी ः चार देशी बनावटीचे पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त

पांचगणी न्यूज नेटवर्क

कराड, दि. 11 ः देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अफताब बादशाह मोमीन (वय 24), रोहन मेहबुब शेख (वय 19, दोघेही रा. रा. मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (वय 23, रा. काले, ता. कराड) व ओंकार प्रकाश हिंगणे (वय 25, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
डीवायएसपी राजश्री पाटील पुढे म्हणाल्या, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी कराड शहर व परिसरात बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कराड शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस हवालदार संदीप कुंभार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत चौघेजण विनापरवाना पिस्टल विक्रीकरीता थांबले आहेत. त्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत छापा टाकला असता तेथे अफताब मोमीन, रोहन शेख, अमर पाटील व ओंकार हिंगणे यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता चौघांकडे चार देशी बनावटीचे पिस्टल व आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा 3 लाख 58 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रमुखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, पोलीस हवालदार सतिश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धिरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव, सोनाली पिसाळ यांनी केली.

 

रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा समावेश
बेकायदा पिस्टल विक्रीप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यामध्ये ओंकार हिंगणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत. चौघांकडे कसून चौकशी सुरू असून ते कराडमधील कोणाला पिस्टल विक्री करणार होते. याचीही माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे डीवायएसपी राजश्री पाटील यांनी सांगितले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers