Home » पांचगणी » पाचगणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

पाचगणी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी: येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.

​या प्रसंगी पाचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, नगरसेवक प्रकाश गोळे, नगरसेवक आकाश बगाडे, शशिकांत मोहिते, सुनंदा मोरे, नूतन बगाडे, सचिन तांबे, नितीन वन्ने, संगीता मोहिते, लक्ष्मी मोहिते यांच्यासह परिसरातील सर्व समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

​कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. त्यांची शाहिरी आणि विचार हे समाजाला नेहमीच संघर्ष करण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात. अण्णाभाऊंचे विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन आयुष्यात आत्मसात करणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल.”

​या जयंती सोहळ्यानिमित्त अण्णाभाऊ साठे नगरमध्ये विविध सामाजिक व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्ते व समाजबांधवानी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers