Home » सातारा » सातारा जि प माध्यमातून स्वयंपाक घर होणार विषापासून स्वातंत्र्य..

सातारा जि प माध्यमातून स्वयंपाक घर होणार विषापासून स्वातंत्र्य..

 

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची दमदार सुरुवात झाली असून अन्न, वस्त्र, निवारा यापैकी विषमुक्त अन्न आणि स्वयंपाक घर विषयापासून स्वातंत्र्य चळवळ सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनी शनिवारी १५ ऑगस्ट रोजी साताऱ्यात विषमुक्त स्वयंपाक घर अभियान सुरू होणार आहे.

या सर्व उपक्रमांना “विषमुक्त गाव स्पर्धा” या जिल्हास्तरीय स्पर्धेशी जोडण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत लोकसहभागातून गावाला भेसळमुक्त आणि निरोगी बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

अन्नभेसळ व हानिकारक खाद्य रंगांविषयी जनजागृती , नागरिकांमध्ये सुरक्षित अन्न निवडीच्या सवयी विकसित , प्रत्येक घरात “विषमुक्त स्वयंपाकघर” , अन्नपदार्थांवरील लेबल वाचण्याची सवय , महिला बचत गटांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उत्पादनासाठी सक्षम करणे, सुरक्षित अन्न विक्रीबाबत दुकानदारांची सुद्धा जबाबदारी निर्माण करणे. विद्यार्थी व युवकांना अन्न सुरक्षा दूत म्हणून तयार करणे. स्थानिक, हंगामी, पौष्टिक व पारंपरिक अन्नसंस्कृतीला प्रोत्साहन देणे. ग्रामपंचायतींमध्ये सकारात्मक स्पर्धेद्वारे अन्न सुरक्षा चळवळ निर्माण करणे. असे हे सातारा जिल्हा परिषदेचे अभियान आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने माहिती व जनजागृतीसाठी ग्रामसभा, शाळांमधील कार्यशाळा, शाळेत अन्न भेसळ तपासणी प्रात्यक्षिके, महिला बचत गट प्रशिक्षण, भेसळ तपासणी आपल्या द्वारी, सोशल मीडिया अभियान, माहितीपट, पोस्टर व जनजागृती साहित्य, लोकसहभागआणि विषमुक्त स्वयंपाकघर अभियान, सुरक्षित स्वयंपाकघर प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री शुद्धसत्व दुकान प्रमाणन भेसळ तपासणी प्रात्यक्षिके,आरोग्यदायी पाककलेची प्रात्यक्षिके व खाद्य प्रदार्थ स्टॉल, विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उत्कृष्ट गाव, शाळा, महिला बचत गट आणि दुकानदारांचा गौरव व प्रशिक्षण असा हा तीन महिन्याचा अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ .प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली. या वेळेला मायलो बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, कृषी सभापती लता कर्णे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण बाबर, श्री. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .महेश खलिपे, डॉक्टर सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये दुपारचे भोजन करताना काही महिलांना विषमुक्त स्वयंपाक घराची माहिती जनजागृती चा भाग म्हणून सामाजिक जाण असलेले पत्रकार विशाल कदम व अजित जगताप यांनी दिली. सदरच्या महिलांन उदंड प्रतिसाद दिला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers