हर घर तिरंगा’ अभियानाने पांचगणीत देशभक्तीचा उत्साह; भाजप पदाधिकाऱ्यांची बाजारपेठेत पदयात्रा आणि ध्वजवाटप
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभरात राबवल्या जाणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय अभियानाला पांचगणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रध्वजाचे महत्त्व पटवून देत नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि तिरंग्याचा सर्वोच्च सन्मान राखण्याचा संदेश देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पांचगणी शहरात विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. पांचगणीच्या मुख्य…