पांचगणी

‘रीड अँड राईज स्कूल’च्या भिंतींवर उमटले कल्पकतेचे रंग; ‘डिझाईन युवर क्लासरूम’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सजवली स्वप्ने!

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे पाचगणी (प्रतिनिधी): चौकटबद्ध अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला, तर वर्गखोल्यांचे रूप कसे बदलू शकते, याचा अनोखा प्रत्यय पाचगणी येथील नामांकित ‘रीड अँड राईज स्कूल’मध्ये पाहायला मिळाला. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘डिझाईन युवर क्लासरूम’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीची उधळण करत चार भिंतींना केवळ रंगवले नाही, तर त्यांना शैक्षणिक

वाढदिवसाचे औचित्य साधत संभाजी भिलारे गुरुजींचा डिजिटल साक्षरतेचा ध्यास; ५० गरजू विद्यार्थ्यांना मोफत ‘MS-CIT’ चे बळ!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सध्याच्या आधुनिक युगात संगणक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे; मात्र ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अनेकदा या संधींपासून वंचित राहावे लागते. हीच सामाजिक जाणीव ठेवून शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी केंद्रप्रमुख संभाजी भिलारे गुरुजी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील ५० गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत ‘MS-CIT’ संगणक

विद्या निकेतन हायस्कूलमध्ये पोलिसांचा संवाद; ‘सुरक्षिततेचा धडा’ गिरवत विद्यार्थिनींनी शिकले सुरक्षेचे धडे

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : नेहमीच्या अभ्यासाच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थिनींना वास्तव जीवनातील सुरक्षेचे धडे देण्याच्या उद्देशाने पाचगणी येथील विद्या निकेतन हायस्कूलमध्ये विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अथर्व बिरामणे यांच्या पुढाकारातून आणि पाचगणी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने पार पडलेल्या या कार्यक्रमात पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस कर्मचारी जाधव व अमोल

पाचगणी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा पूर्वनियोजितच; सर्वांना संधी देण्यासाठीच गोळे यांचा राजीनामा : नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांचे स्पष्टीकरण

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर शहरात राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच, यावर नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन करताना ठरलेल्या धोरणानुसारच झाल्याचा खुलासा नगराध्यक्ष बगाडे यांनी केला आहे.

पाचगणीत उपनगराध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; पुढचा उपनगराध्यक्ष कोण? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्याकडे सोपवला असून, तो तात्काळ मंजूर करण्यात आला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि गाजावाजा न करता गोळे यांनी थेट राजीनामा सादर केल्यामुळे उपनगराध्यक्षपद अधिकृतपणे रिक्त झाले असून पाचगणीच्या राजकीय वर्तुळात सध्या पुढचा उपनगराध्यक्ष कोण? याची चर्चा

मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत बिल्लीमोरिया हायस्कूलला उपविजेतेपद; रोमहर्षक सामन्यात पाचगणीच्या संघाने कोरले यशाचे नाव

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या पाचगणीच्या बिल्लीमोरिया हायस्कूलने पुन्हा एकदा आपल्या क्रीडा कौशल्याचा दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मानाच्या ‘मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धे’मध्ये बिल्लीमोरिया हायस्कूलच्या १५ वर्षांखालील फुटबॉल संघाने अटीतटीच्या लढतीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तब्बल १६ मातब्बर संघांना मागे टाकत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत चुरशीच्या आणि

पांचगणी पालिकेचा ‘कोंडवाडा’ कागदावरच? मोकाट जनावरांच्या हैदोसामुळे पर्यटक-स्थानिक त्रस्त; थेट नगरसेवकाच्या घरात घोड्याचा ठिय्या!

पांचगणी न्यूज नेटवर्क  पांचगणी : जागतिक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या पांचगणी शहराला सध्या मोकाट जनावरांच्या समस्येने पुरते वेढले आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य बाजारपेठ, रस्ते आणि गल्ल्यांमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस वाढला असून, यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असतानाही, पांचगणी नगर पालिका प्रशासन

आषाढी वारी दरम्यान घरफोड्यांपासून सावधान! पांचगणी पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पांचगणी न्यूज नेटवर्क  पांचगणी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचे वातावरण आहे. पांचगणी व परिसरातील शेकडो भाविक दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी वारी, दिंडी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मात्र, विठ्ठल दर्शनाच्या या आनंदाच्या काळात पाठीमागे बंद असणाऱ्या घरांचा गैरफायदा चोरटे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर, महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र

पाचगणीनजीक गोडवलीत चोरट्यांचा हैदोस; तांब्याचा बंब, हंड्यासह ६ विहिरींवरील मोटारींच्या वायर लंपास, शेतकरी भयभीत

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य गोडवली गावात काल रात्री चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घालत धुमाकूळ घातला. अज्ञात चोरट्यांनी एका घराबाहेर ठेवलेले तांब्याचे मौल्यवान साहित्य आणि तब्बल ६ वेगवेगळ्या विहिरींवरील पाण्याच्या मोटारींच्या तांब्याच्या वायर कापून पोबारा केला आहे. या एकाच रात्री घडलेल्या धाडसी चोऱ्यांच्या सत्रामुळे संपूर्ण गोडवली परिसरासह पाचगणी परिसरात प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पाचगणीच्या वैभवात भर: ‘कित्तूरकर डेंटल क्लीनिक’मुळे शहराची दंत पर्यटनाकडे वाटचाल – ना. मकरंद पाटील

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : “सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले ‘कित्तूरकर डेंटल क्लीनिक’ पाचगणीच्या वैभवात मोलाची भर घालणारे आहे. भविष्यात डॉ कित्तूरकर यांच्यामुळे हे पर्यटन स्थळ केवळ पर्यटनासाठीच नव्हे, तर दर्जेदार दातांच्या उपचारांसाठीही देशभरात नावारूपाला येईल,” असा ठाम विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केला.   ​पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील