महाबळेश्वर

निसर्गाच्या कुशीत पर्यटनाचा आनंद घेताना नियमांचे पालन करा; विल्सन पॉईंटवर वनविभागाचे कडक निर्बंध!

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर: निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील विल्सन पॉईंटवर (सनराईज पॉईंट) दररोज हजारो पर्यटक हजेरी लावतात. मात्र, हे ठिकाण सातारा वनविभागाच्या अधिपत्याखाली येत असून ते एक ‘राखीव वनक्षेत्र’ आहे. या भागातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यटनाला शिस्त लावण्यासाठी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती भेकवली यांच्या वतीने संयुक्त पावले उचलण्यात

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी दिल्या सायकली भेट…

उप मुख्यमंत्र्यांनी गावात विद्यार्थ्यांसाठी दिल्या सायकली भेट..पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप महाबळेश्वर : निसर्ग रम्य शिवसागर जलाशयाचा परिसर आता पर्यटनासाठी सज्ज झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या दरेतांब गवातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी उपमुख्यमंत्री शिंदे थेट मुंबईकडे रवाना झाले. जाण्यापूर्वी त्यांनी अजून स्थानिक शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकली वाटप करून मुलांनी शिक्षणामध्ये

पाचगणीकरांवर ऐन उन्हाळ्यात जलसंकट! वेण्णा लेक येथील मुख्य पंप जळाला; पाणीपुरवठा दोन दिवस ठप्प; प्रशासनाच्या ‘स्टँडबाय’ नियोजनावर ग्राहकांचा संतप्त सवाल

पाचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : पर्यटननगरी पाचगणीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतालाच तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागल्याने संपूर्ण शहरावर पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक (वेण्णा तलाव) पंपिंग स्टेशनवरील मुख्य एचपी मोटर पंप आणि फ्युज एकाच वेळी जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे पाचगणी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, पुढील दोन