सातारा

तख्ताचा वाडा’ उभारणीची,येसूबाई फाउंडेशनची आक्रमक भूमिका

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा  : सातारा शहरातील गुरुवार बाग ऐतिहासिक वारसा आहे .साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक आहे . गुरुवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यानामध्ये ऐतिहासिक स्वरूपातील ‘तक्ताचा वाडा’ पुनर्बांधणी करून तेथे श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा, दि. १८ : जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने एकत्र काम करावे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण(दिशा) समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद

जिल्ह्यात २२ ते २६ जुलै दरम्यान महाराजस्व अभियान

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा, दि. ११- सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत २२ ते २६ जुलै दरम्यान ‘महाराजस्व अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या अभियानामध्ये सर्व विभागांचा सहभाग असणार आहे. विधानसभा क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी हे अभियान राबवण्यात

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

पांचगणी न्यूज नेटवर्क ​सातारा, दि. ११ – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून १५ ते १९ जुलै या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उत्तम सुविधा पुरवण्यासाठी आणि सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पाडेगाव येथील दत्त घाट व लोणंद येथील पालखीतळाला भेट देऊन पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी

रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी…..

रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी…. पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध निधी खर्च केला जातो. काही ठिकाणी नागरी सुविधा ऐवजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने रुग्णांची हेळसांड होते. आता तर कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क आरोग्यसेविकेलाच तक्रार देण्याची वेळ आली. अखेर सातारा

पेटती चिता महापुरात गेली वाहून पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील ढोरोशी गावातील थरकाप उडवणारे वास्तव

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : जिवंत असताना माणसाला मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो हे आपण रोजच पाहतो, पण मृत्यूनंतरही एका मृतदेहाच्या नशिबी अशी वेदनादायी विटंबना यावी? साताऱ्यातील ढोरोशी गावात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाची पेटती चिता गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत ओढ्याच्या पुरात वाहून गेली. अंत्यसंस्कार अपूर्ण

सर आईन्स्टाईन अकॅडमीच्या गुणवंतांचे राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश; खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भव्य गौरव

पांचगणी न्यूज नेटवर्क  सातारा : प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात सातत्याने आपल्या गुणवत्तेचा आणि यशाचा आलेख उंचावत ठेवणाऱ्या सातारा येथील नामांकित ‘सर आईन्स्टाईन अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी यंदाही राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘एनआयटी’ या केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेश मिळविलेल्या अकॅडमीच्या चार गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सातारा येथे खासदार

शिरवळकरांचे मोर्चाद्वारे अमली पदार्थ विरोधात झाले आंदोलन….

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप शिरवळ : पुणे सातारा हद्दीतील महामार्ग नजीक शिरवळ नगरीमध्ये सध्या अल्पवयीन मुलांसोबत अनेक जण अमली पदार्थ व पावडर नशा पान करत आहेत. याबाबत लेखी तक्रार करूनही गंभीर दखल घेतली नसल्यामुळे शिरवळकरांनी आज मोर्चाद्वारे अमली पदार्थ विरोधात आंदोलन केले. अमली पदार्थाचा व्यापार व बाळगणाऱ्यांना कायदेशीर कारवाई होईपर्यंत हे आंदोलन केले जाईल

सातारा जिल्ह्यातील ‘या’ ५ तालुक्यांमधील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या बेफाम पावसामुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या

प्राथमिक शिक्षक बँकेच्या आदर्शवत सभेने सभासदांची मन जिंकली..         

पांचगणी न्यूज नेटवर्क / अजित जगताप सातारा : सहकार क्षेत्रामध्ये नियमाप्रमाणे वार्षिक सभा आयोजित केली जाते. या सभेला अनेकदा गोंधळ व आरोप प्रत्यारोप होतात. परंतु ,अलीकडच्या काळामध्ये सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेला आदर्शवत अशी कामगिरी होत असल्याने सर्व सभासदांची संचालकांनी मनी जिंकली आहेत. हे या वार्षिक सभेचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. सातारा जिल्हा