Home » सातारा » ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी दि: २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी दि: २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण

० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी दि: २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकर….

पांचगणी न्यूज नेटवर्क/ अजित जगताप

सातारा : जन्माला आल्यानंतर पण पोलिओ लसीकरण मोहिमेत ज्यांच्या बोटावर शाई लागली. आज तेच बालक २१ वर्षानंतर नंतर लोकशाहीचा अधिकार म्हणून मतदान करत आहे. पुन्हा एकदा ० ते ५ वयोगटातील बालकासाठी रविवार दिनांक २८ जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेमुळे एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही.

 

सर्व बालकांना विहीत वयात प्राथमिक लसिकरण, नियमित ए एफ पी सर्व्हेक्षण आणि राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिमे अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ०.५ वर्षाखालील दोन लाख ३१० बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे.

सदर बालकांना जिल्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय या ठिकाणी पोलिओ लसिकरण डोस देण्यात येणार आहे. या पुर्वी सातारा जिल्हयात १०० टक्के डोस देण्याचे काम झालेले आहे.

सातारा जिल्ह्यात ग्रामीण भागात १,६७,५४७ व शहरी भागात ३२,७६३ 32,763 असे एकूण दोन लाख तिनशे दहा बालकांना डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण २२४४ व शहरी १८२ असे एकूण २४२६ बूथ उभारणी करण्य

ग्रामीण८९ व शहरी ५२ असे एकूण १४१ ट्रांजिट कॅम्प व ग्रामीण १२५ व शहरी ८ असे एकूण १३३ मोबाईल टीम पल्स पोलिओ लसीकरण करीता एकूण २०४ वैद्यकिय अधिकारी व ५९७४ कर्मचारी यांची नियुक्ती करणेत आली आहे.

ग्रामीण व शहरी विभागात सर्व्हे करुन नविन जन्मलेल्या सर्व बालकांची नोंदणी आरोग्य विभागा मार्फत करणेत येत आहे. तसेच जिल्हयाती उसतोड कामगार, विठभट्टी कामगार, बांधकाम व रस्त्याचं कामगार व मजूर यांच्या मुलांची नोंदणी करणेत येत आहे. सातारा जिल्हयात सर्व आरोग्य संस्था मध्ये पुरेशी लस उपलब्ध आहे.

श्रीम याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शना मध्ये डॉ महेश खलीपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि प सातारा व डॉ अभिराज सुर्यंवशी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी सातारा जिल्हयातील सर्व 0-5 वर्ष वयोगटातील पालकांना डोस देणे बाबतची नियोजन केले आहे. अशी माहिती सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले व मान्यवरांनी दिले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers