“डॉक्टरांच्या सेवेला विद्यार्थ्यांचा सलाम!” विद्या निकेतन हायस्कूलचा पाचगणीत आगळावेगळा ‘डॉक्टर्स डे’ उपक्रम
विद्यार्थ्यांनी थेट दवाखान्यात जात डॉक्टरांशी साधला थेट संवाद; कृतज्ञता सोहळ्याने डॉक्टरही भारावले पाचगणी: दरवर्षी १ जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बहुतांश ठिकाणी केवळ औपचारिक भाषणे आणि कार्यक्रमांवर भर दिला जात असताना, पाचगणी येथील प्रसिद्ध ‘विद्या निकेतन हायस्कूल’च्या विद्यार्थ्यांनी मात्र थेट रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णसेवेला आपले आयुष्य वाहणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानत एक…