गोडवलीत पावसाच्या तांडवाने शेतजमीन पुन्हा खचली; तपनेश्वर मंदिराशेजारील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : पाचगणी आणि परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार आणि मुसळधार पावसाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. या संततधार पावसामुळे पाचगणी शहराच्या अगदी जवळच असलेल्या आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची ऐतिहासिक जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे पुन्हा एकदा भूस्खलनाचा प्रकार घडला आहे. गावातील प्रसिद्ध…