ग्रामीण महाराष्ट्राच्या कायापालटाची महाबळेश्वरातून नांदी! ‘समृद्ध पंचायत राज’साठी राज्यस्तरीय मंथन, ना. जयकुमार गोरेंच्या हस्ते उद्घाटन
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि गावपातळीवरील प्रशासनाला आधुनिकतेची जोड देत अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचा शानदार शुभारंभ झाला. येथील एव्हरशाईन रिसॉर्टमध्ये आयोजित या अत्यंत महत्त्वाच्या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार…