Home » सातारा » जिल्ह्यात २२ ते २६ जुलै दरम्यान महाराजस्व अभियान

जिल्ह्यात २२ ते २६ जुलै दरम्यान महाराजस्व अभियान

पांचगणी न्यूज नेटवर्क

सातारा, दि. ११- सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत २२ ते २६ जुलै दरम्यान ‘महाराजस्व अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या अभियानामध्ये सर्व विभागांचा सहभाग असणार आहे.

विधानसभा क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देता यावा यासाठी योजनांची कागदपत्रे एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विभागांनी योग्य ते नियोजन करावे व जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers