
कृष्णा विश्व विद्यापीठाचा सोमवारी १४ वा दीक्षांत सोहळा : ९७२ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड, ता. २७ : येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत सोहळा सोमवारी (ता. २९) सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ उपस्थित राहणार असून, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले












