
हातगेघर उपसा सिंचन योजनेला तत्त्वतः मान्यता; २२७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश
पांचगणी न्यूज नेटवर्क करहर : जावली तालुक्यातील दुष्काळी आणि सिंचनापासून वंचित असलेल्या हातगेघर परिसरासाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हातगेघर उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत मंत्रालयात घेतलेल्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे









