प्रशासनाचा ‘सील’ कागदावरच? पाचगणीच्या प्रसिद्ध ‘हॅरिसन फॉली’ पॉईंटवर नियमांचे उल्लंघन; मद्यपींचे अड्डे आणि पर्यटकांची असुरक्षित गर्दी
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘हॅरिसन फॉली’ (थापा पॉईंट) या वादग्रस्त जमिनीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करत कारवाई केली होती. महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांनी ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३’ च्या कलम १६४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर…