पावसाळ्यात पर्यटकांना नो एन्ट्री! पाचगणी-महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे पुढील ५ दिवस पूर्णपणे बंद; आदेश मोडल्यास कडक कारवाई; सपोनी दिलीप पवार यांचा इशारा
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ आणि ‘रेड’ अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस व तालुका प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. संभाव्य अतिवृष्टी आणि आपत्तीचा धोका लक्षात घेऊन वाई उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी ६ जुलै ते १० जुलै २०२६ या पाच दिवसांच्या…