गटशेतीची ताकद! करंदोशीतील महिला बचत गटांनी अवघ्या एका दिवसात ४० एकर क्षेत्रावर केली जीवामृत फवारणी; कृषी क्रांतीचा नवा आदर्श
पांचगणी न्यूज नेटवर्क कुडाळ : एकता आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर शेतीत काय चमत्कार घडू शकतो, याचे आदर्श उदाहरण करंदोशी येथील महिलांनी घालून दिले आहे. येथील ‘विघ्नेश्वर सोयाबीन समूह’ आणि ‘नवलाई समूह’ या दोन्ही शेतकरी महिला गटांनी एकत्र येत गटशेती अंतर्गत तब्बल १०० लिटर जीवामृत तयार केले. इतकेच नव्हे तर, सर्व महिला सदस्यांनी एकत्रित कष्ट करत…