आनेवाडीच्या सोनिया फरांदे बनल्या सहायक नगर रचनाकार : एमपीएससी परीक्षेत यश मिळवत वडिलांचे स्वप्न केले साकार
पांचगणी न्यूज नेटवर्क / प्रशांत गुजर आनेवाडी , ता. १४ (प्रतिनिधी) : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जावळी तालुक्यातील आनेवाडी गावच्या कन्या सोनिया संजय फरांदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत सहायक नगर रचनाकार, श्रेणी-१ (गट-ब, राजपत्रित) या उच्च पदाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे आदेश…