महाबळेश्वर आगारात पत्रकारांशी हुज्जत घालणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड; सातारा विभागीय नियंत्रकांची धडक कारवाई, जिल्हाभरातील पत्रकार संघटनांच्या एकजुटीचा विजय
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : महाबळेश्वर एसटी आगारातील एका जबाबदार अधिकाऱ्याने प्रवासी आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अत्यंत उर्मट आणि अपमानास्पद भाषेत वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या उद्दाम वर्तनाचे तीव्र पडसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यात उमटले असून, पत्रकार संघटनांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सातारा विभागीय…