पाचगणीत सेंट पीटर शाळेची ‘ती’ लाकडी कमान मृत्यूचा सापळा; पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या अपघाताची भीती
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : पांचगणी शहरातील अंतर्गत रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला असतानाच, आता ‘बेबी पॉईंट ते संजीवन नाका’ या मुख्य अंतर्गत रस्त्यावर असलेल्या सेंट पीटर शाळेच्या परिसरातील ऐतिहासिक लाकडी कमानीमुळे नागरिकांच्या जिवाला घोर लागला आहे. अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही लाकडी कमान सध्या अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचली असून, ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत…