‘आय लव्ह पांचगणी फेस्टिव्हल’चे दिमाखात उद्घाटन साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांची पर्वणी; पहिल्याच दिवशी पर्यटकांची तोबा गर्दी
पांचगणी, ता. २७ : नभांगणात उंच भरारी मारणारे पॅराग्लायडर्स, सुमधुर गीतांचा आस्वाद, चटकदार पदार्थांची मेजवानी आणि रसिकांना ठेका धरायला लावणारे नृत्याविष्कार अशा उत्साही वातावरणात ‘आय लव्ह पांचगणी फेस्टिव्हल २०२६’ चे संजीवन विद्यालयाच्या शरद पंडित स्टेडियमवर दिमाखात उद्घाटन झाले. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिक आणि देशभरातून आलेल्या पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तोबा…