सर आईन्स्टाईन अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांचा ‘एनआयटी’मध्ये डंका; वेदांत, निराली आणि आयुषचे दैदिप्यमान यश!
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : “ज्ञान मिळवण्यापेक्षा कल्पकता आणि परिश्रम अधिक महत्त्वाचे असतात,” या जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या उक्तीला सार्थ ठरवत सातारा शहरातील नामांकित ‘सर आईन्स्टाईन अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ (JEE) परीक्षेत यशाचे शिखर सर केले आहे. अकॅडमीचे गुणवंत विद्यार्थी वेदांत संतोष राऊत, कु. निराली दीपक कदम आणि आयुष देविदास शेवते यांनी देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान…