रांजणी जिल्हा परिषद शाळेच्या नव्या वास्तूचे थाटात लोकार्पण; दर्जेदार शिक्षण व पर्यटनातून रोजगार वाढवणार : वसंतराव मानकुमरे
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी: सन १८८८ मध्ये स्थापन झालेल्या आणि तब्बल १३८ वर्षांची गौरवशाली शैक्षणिक परंपरा लाभलेल्या जावळी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेच्या नूतन भव्य इमारतीचा लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी रांजणी, घोटेघर आणि वहागाव परिसरातील आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून…