राज्यस्तरीय रिंक फुटबॉल स्पर्धेत पाचगणीच्या विद्या निकेतन हायस्कूलचा डंका; पटकावला तृतीय क्रमांक!
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : क्रीडा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीतील नामांकित ‘विद्या निकेतन हायस्कूल’ने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपल्या यशाचा सुवर्णध्वज फडकावला आहे. येथील संजीवन विद्यालय येथे २७ व २८ जून २०२६ रोजी पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘इंटर-स्कूल स्टेट रिंक फुटबॉल चॅम्पियनशिप’ या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्या निकेतनच्या १२ वर्षांखालील मुलांच्या ६-अ-साइड संघाने दमदार कामगिरी…