शामगावात कृत्रिम म्हशीचे दूध बनविणाऱ्या दाम्पत्याच्या कारखान्यावर धाड एफडीएची कारवाई; पामोलीन तेल, संशयित पावडरसह साहित्य जप्त
पांचगणी न्यूज नेटवर्क मसूर ः तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज आणि तडफदार प्रशासकीय कार्यशैलीची आठवण करून देणारी कारवाई करत अन्न व औषध प्रशासनाने कराड तालुक्यात प्रथमच दूध भेसळीविरोधात मोठा धडक छापा टाकला. शामगाव (ता. कराड) येथील एका घरात कृत्रिम म्हशीचे दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहात पकडण्यात आले असून, भेसळीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे….