भिलारचे प्रगतशील शेतकरी गणपतराव पार्टे यांना राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ प्रदान : मुंबईत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; स्ट्रॉबेरी पिकातील नाविन्यपूर्ण प्रयोगाची घेतली दखल
पांचगणी न्यूज नेटवर्क भिलार : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळ्यात, सातारा जिल्ह्यातील ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार येथील नामांकित स्ट्रॉबेरी तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी गणपतराव रामचंद्र पार्टे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबईतील वरळी येथील डोम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर…