पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पांचगणी पोलिसांचा बडगा; घोडे रस्त्यावर मोकळे सोडल्यास होणार कायदेशीर कारवाई!
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : हवेचे ठिकाण आणि पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांचगणी आणि टेबल लँड परिसरात मोकळे फिरणारे घोडे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सार्वजनिक रस्ते, मोकळी मैदाने आणि पर्यटनस्थळांवर घोड्यांना चरण्यासाठी अथवा मुक्तपणे सोडणाऱ्या घोडे व्यावसायिकांना पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पोलिसांनी…