पाचगणीनजीक गोडवलीत चोरट्यांचा हैदोस; तांब्याचा बंब, हंड्यासह ६ विहिरींवरील मोटारींच्या वायर लंपास, शेतकरी भयभीत
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य गोडवली गावात काल रात्री चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घालत धुमाकूळ घातला. अज्ञात चोरट्यांनी एका घराबाहेर ठेवलेले तांब्याचे मौल्यवान साहित्य आणि तब्बल ६ वेगवेगळ्या विहिरींवरील पाण्याच्या मोटारींच्या तांब्याच्या वायर कापून पोबारा केला आहे. या एकाच रात्री घडलेल्या धाडसी चोऱ्यांच्या सत्रामुळे संपूर्ण गोडवली परिसरासह पाचगणी परिसरात प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे….